श्रीरामकृष्ण विवेकानंद समितीत खालील प्रमाणे उपक्रम चालविण्यात येतात


1) धार्मिक उपक्रम:-

येथे मंदिरात नित्य पूजा व प्रार्थना करण्यात येते. तसेच गुरूपौर्णिमा, दुर्गा महाअष्टमी, भगवान श्रीरामकृष्णदेव जयंती, श्रीसारदादेवी जयंती, स्वामी विवेकानंद जयंती व इतर अवतारांच्या जयंत्या साजऱ्या करण्यात येतात, तसेच श्रीरामकृष्णदेवांचे अंतरंग संन्यासी पार्षद यांच्या जयंत्या देखील साजऱ्या करण्यात येतात. प्रत्येक एकादशी निमित्त येथे रामनामसंकीर्तन व सत्संगाचे आयोजन केले जाते. रामकृष्ण संघाचे जगभरातील नामवंत व उत्कृष्ट वक्ते संन्यासी यांचे वेळोवेळी व्याख्यानांचे कार्यक्रम समितीत अथवा इतर संस्थांमध्ये आयोजित केले जातात.

२. सामाजिक व शैक्षणिक उपक्रम

समिती मार्फत समाजोपयोगी तथा विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतात.


Donation