येथे मंदिरात नित्य पूजा व प्रार्थना करण्यात येते. तसेच गुरूपौर्णिमा, दुर्गा महाअष्टमी, भगवान श्रीरामकृष्णदेव जयंती, श्रीसारदादेवी जयंती, स्वामी विवेकानंद जयंती व इतर अवतारांच्या जयंत्या साजऱ्या करण्यात येतात, तसेच श्रीरामकृष्णदेवांचे अंतरंग संन्यासी पार्षद यांच्या जयंत्या देखील साजऱ्या करण्यात येतात. प्रत्येक एकादशी निमित्त येथे रामनामसंकीर्तन व सत्संगाचे आयोजन केले जाते. रामकृष्ण संघाचे जगभरातील नामवंत व उत्कृष्ट वक्ते संन्यासी यांचे वेळोवेळी व्याख्यानांचे कार्यक्रम समितीत अथवा इतर संस्थांमध्ये आयोजित केले जातात.
समिती मार्फत समाजोपयोगी तथा विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतात.
भगवान श्रीरामकृष्ण परमहंस म्हणजे या शतकातील ईश्वरी अवतारच एक अद्भुक्त असे ईश्वरी रसायनच ते स्वतःकडे बोट दाखवत नेहमी म्हणत की जो राम जो कृष्ण तोच रामकृष्ण आणि खरोखरच त्यांचे दिव्य जीवन पाहता या गोष्टीचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही
आजच्या आधुनिक युगामध्ये विज्ञाननिष्ठ तसेच जगातील अनेक विद्वानालाही त्यांच्या चरणी लोटांगण घेतल्याशिवाय ईश्वरी साक्षात्काराचा पर्यायच उपलब्ध होऊ शकला नाही
म्हणूनच स्वामी विवेकानंद सारख्या विद्वानांनाही श्रीरामकृष्णांचा चरण स्पर्श झाल्याशिवाय ईश्वरी साक्षात्कार होऊ शकला नाही
कारण मुळातच लहान पणापासून ईश्वराची असीम ओढ नरेंद्रनाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंद यांना असल्यामुळे ते नेहमीच विविध धर्मसंप्रदायांच्या अनेक साधू संन्याशांच्या दर्शनाला जात अनेक सभा प्रवचने धर्म पंडितांची व्याख्याने त्यांनी अनेकदा ऐकली अनेक धर्मपंडिसांची नरेंद्रनाथ नेहमीच चर्चा करीत असत चर्चेच्या शेवटी या सर्वांना नरेंद्रनाथ नेहमी एकच प्रश्न करायचे ह्या ज्या साऱ्या गोष्टी तुम्ही ईश्वरा बाबतीत व धर्माबाबतीत सांगितल्या त्या काय तुम्ही प्रथम अनुभवाच्याद्वारे जाणले आहेत की तसा केवळ तुमचा विश्वास आहे परंतु साऱ्या धर्मपंडितांकडून एक ठराविकच उत्तर असायचे की तसा आमचा धर्मग्रंथावर ईश्वरावर ठाम विश्वास आहे त्यावर नरेंद्रनाथ पुन्हा एक प्रतिप्रश्न करायचे मग तुम्हाला ईश्वरी दर्शन झाले असेलच परंतु या साऱ्या धर्मपंडितांचे उत्तर ऐकून नरेंद्रनाथ शेवटी निराश व्हायचे या नैराशीत मधून त्यांनी स्वतःशीच असा एक सिद्धांत बांधला की हे लोक धर्माच्या नावावर केवळ लोकांना फसवीत आहे स्वतःचेच अस्तित्व निर्माण करण्याचे व टिकवण्याचे प्रयत्न करत आहेत
हे लक्षात आल्यावर नरेंद्रनाथ यांच्या तरुण मनावर निराशे ते दाट ढग जमले असतानाच अचानक दिव्य प्रकाश या निराशेच्या दाट छायेतून त्यांच्यापर्यंत येऊन त्यांचा भाग्योदय झाल्याची अनुभूती त्यांना आली मित्रांच्या सांगण्यावरून दक्षिणेश्वरी राहणाऱ्या मा काली पुजाऱ्याचे अर्थात श्रीरामकृष्णांचे ईश्वरी स्वरूपात साक्षात दर्शन झाले पुढे हळूहळू श्रीरामकृष्णांचे उपदेश श्रवण करण्यासाठी नरेंद्रनाथ आपल्या मित्रांसोबत श्रीरामकृष्णांकडे वारंवार जाऊ लागले परंतु मनातील संभ्रम हा कायम होता
कारण श्रीरामकृष्ण दिसायला एखादा साधारण माणसाप्रमाणे दिसत होते त्यांच्यात बाहेरून असाधारण असे काहीच आढळत नव्हते अगदी सरळ सोप्या भाषेत ते उपदेश करायचे म्हणूनच नरेंद्रनाथ कधी कधी स्वतःलाच म्हणायचे की ह्या व्यक्तीला एक मोठा धर्मपंडित किंवा धर्माचार्य म्हणणे कसे बरे शक्य आहे ?ते काहीही असो त्यांचे उपदेश आपल्या मनाला पटत आहेत याच भावनेतून श्रीरामकृष्णांच्या अधिक जवळ नरेंद्रनाथ गेले आणि एक दिवस जो प्रश्न ते इतरांना विचारून भांबावून सोडत होते तोच प्रश्न श्रीरामकृष्णांना त्यांनी विचारला महाराज आपला ईश्वरावर विश्वास आहे काय ?आपण ईश्वर पाहिला आहे काय? त्यावर श्रीरामकृष्णांनी तात्काळ असंधिग्ध उत्तर दिले होय तर आपण त्यांच्या अस्तित्वासंबंधी काही प्रमाण देऊ शकता काय? त्यावर पुन्हा श्री रामकृष्ण आणि तात्काळ उत्तर दिले होय तर नरेंद्रनाथ पुन्हा म्हणाले मग ते प्रमाण कोणते? त्यावर भगवान श्री रामकृष्ण म्हणाले 'प्रमाण प्रमाण ,हेच की तुला जसा आपल्यासमोर बघतो आहे त्यालाही तसाच बघत आहे फक्त एवढेच की त्याला अधिक स्पष्टपणे उज्वल पणे हे विश्व व्यापून टाकणाऱ्या प्रकाश स्वरूपात पाहतो हे उत्तर ऐकून नरेंद्रनाथ दत्त अर्थात दिग्विजय स्वामी विवेकानंद निशब्दच होऊन गेले
होय मी मी ईश्वर पाहिलेला आहे असे छातीठोकपणे व अगदी निसंदेह पणे तोही प्रमाण देत ठासून सांगणारा हा माणूस आहे तरी कोण कोण आहे या प्रश्नाच्या जिज्ञासे पोटी श्रीरामकृष्ण यांच्याकडे नरेंद्रनाथ दत्त यांचा मुक्काम वाढू लागला त्यामुळे श्रीराम कृष्ण ईश्वरी अवतार असल्याची त्यांना अनुभूती होऊ लागले
आजच्या विज्ञान युगामध्ये जन्म मृत्यूचे रहस्य आत्मा परमात्मा चे अस्तित्व संन्यास धर्माचे महत्त्व तसेच वेदांत पुराणातील अनेक दाखले देऊन पोपटपंची करणाऱ्या अनेक पंडितांनी धर्म बाजारच मांडलेला दिसून येतो
परंतु या आजच्या धावपळीच्या युगात मानवाला सहज पटेल समजेल मानवेल अशा तऱ्हेचे आपल्या धर्माविषयी भगवंताविषयी प्रमाणबद्ध विचार श्रीरामकृष्णांनी आपल्या दैनंदिन गप्पा गोष्टी मधून सहज सोप्या भाषेत व गोष्टीच्या समोर स्वरूपात भक्तांसमोर मांडल्या आपल्या ऋषीमुनींनी कठीण तपश्चर्येच्या माध्यमातून ज्ञान भक्ती योगाद्वारे तसेच प्रगाढ चिंतनातून आपल्या धर्माची मानव जातीच्या कल्याणाची चिरंतर मूल्ये जपली आहेत जीवनाचे अंतिम ध्येय परमेश्वर प्राप्ती असावे व त्यासाठीच हा मानवी जन्म आहे असे श्री रामकृष्ण ठासून ठासून सांगतात हे ईश्वरी सत्य या आधुनिक युगातील मानवाला रुचेल पचेल अशा स्वरूपात श्री भगवान श्रीरामकृष्णांनी मांडले
श्रीरामकृष्णांना रोज भेटीला येणाऱ्या संन्याशी शिष्यांना गृहस्थ भक्तांना जिज्ञासू मानवाला दर्शनार्थींना ईश्वरा बाबतीत श्री ठाकूर जे उपदेश सहज सोप्या भाषेतून तसेच जीवनातील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टीतून ते करायचे त्याचे संकलन श्रीरामकृष्ण वचनामृत या महान ग्रंथातून प्रकट झालेले आहे
याचे उदाहरण द्यायचे झाल्यास श्रीरामकृष्ण आपल्या भक्तांना सांगतात की परमेश्वर दोनदा हसतो जसे मुलगा खूप आजारी आहे अशा वेळेस वैद्यबुवा येऊन नाडी पाहतात व औषध पथ्य सांगतात आई मोठ्या काकूळवळीने विचारते बरे होईल ना माझे बाळ त्यावर वैद्य बुवा म्हणतात अगदी शंभर टक्के माझ्या या एवढ्या पुढया द्या व सांगितले पथ्य करा की तुमचा मुलगा बरा होईलच परंतु मुलगा बरे होणे न होणे हे वैद्यबुवाच्या किंवा औषधाच्या कारणाने नसते कारण औषधी गुण येणे हे ईश्वरच ठरवतो त्यावेळेस परमेश्वर असतो व दुसरे म्हणजे जमिनीची वाटणी करताना दोघे भाऊ जमीन मोजमाप करतात हा एवढा भाग माझा तर पलीकडचा तुकडा तुझा असे आपसात ठरवतात व जमिनीची वाटणी करून टाकतात
खरे तर हे सारे विश्व ब्रम्हांड त्या एकानेच म्हणजेच परमेश्वराने व्यापली आहे त्याचे कसले वाटे होणार? म्हणून परमेश्वर पुन्हा एकदा हसतो
अशा प्रकारे अनेक सहज पण सोप्या भाषेत श्रीरामकृष्ण भक्तांना उदाहरण देऊन उपदेश करतात व भक्तीचा भगवंताचा मार्ग पटवून देतात संसारात राहून सुद्धा ईश्वरी प्राप्ती होऊ शकते याचे अनेक अनेक गोष्टी स्वरूपाने ते दाखले देतात श्री रामकृष्णाचे जीवन मुळातच चमत्कारी असे होते वरून साधे दिसणारे भगवान श्री रामकृष्ण देव यांची वागणूक मात्र ईश्वरी अवताराप्रमाणेच होती आपल्या पत्नीला सहचारिणीला म्हणजेच मा शारदेला आई म्हणून तर साक्षात मा काली म्हणून तिची ते महापूजा करत होते
जगातील हे एकमेव उदाहरण म्हणून आपण श्रीरामकृष्णाच्या जीवन चरित्राकडे पाहू शकतो भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या साधना काळात विविध धर्मांची साधना करून त्या धर्मातील तत्त्वज्ञान पर्यंत ते जाऊन पोहोचले व त्यातून त्यांनी हा निष्कर्ष काढला की सर्व धर्म म्हणजे एकाच परमेश्वराची आराध करण्याचे विविध मार्ग होत हे तत्त्वज्ञान लक्षात घेऊन त्यांनी लोकांना सर्व धर्माची शिकवण दिली
म्हणूनच त्यांचे परम शिष्य युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद त्यांना अवतार वरिष्ठाय म्हणतात
"स्थापकायच धर्मस्य सर्वधर्मस्वरूपीने अवतार वरिष्ठय श्री रामकृष्णय श्रीरामकृष्णाय,
डॉ मंगेश सुरेशराव निर्मळ
+91-9850313395